ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत शंभर खासदारांच्या अनुमोदनामुळे ऋषी सुनक यांची आगेकूच

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची आगेकूच सुरू आहे. त्यानी काल शंभर खासदारांचं अनुमोदन मिळवल्यानं त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कॅरिबियन बेटांवर सुट्टीसाठी गेलेले माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुन्हा लंडनमध्ये जात आहेत. त्यांना जुलै महिन्यात खासदारांनी पदच्युत केलं होतं. मात्र, ते पक्षात अजून लोकप्रिय असून, त्यांनी अनपेक्षितरित्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. त्यामुळे ते आणि सुनक यांच्यातच चुरस असणार आहे. त्यांना शंभर खासदारांचं अनुमोदन मिळालं नाही, तर सुनक पक्षाचे नेते आणि पंतप्रधान होतील.

कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेतेपदासाठी आणि पंतप्रधानपदासाठी अर्ज करण्यासाठई भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी दुपारी दोनपर्यंत मुदत आहे. दोन्ही उमेदवारांनी अपेक्षित अनुमोदनसंख्या गाठली तर मतदान होईल. शुक्रवारी म्हणजे 28 तारखेला निकाल जाहीर होतील. पेनी मॉडॉंट यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली आहे.