टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने ७ बाद करत ऑस्ट्रेलियासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र ऑस्ट्रेलियाने १० बाद १८० एवढीच धावसंख्या उभारल्याने भारताचा विजय झाला.