महसूल गुप्तवार्ता संचालनालयाकडून मुंबईतून ५०२ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्तमहसूल गुप्तवार्ता संचालनालयाकडून मुंबईतून ५०२ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई विभागाने दक्षिण आफ्रिकेतून लपवून आणलेले कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातली एकूण किंमत अंदाजे पाचशे दोन कोटी रुपये आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या फळांच्या कंटेनरची तपासणी केली असता या फळांआड  लपवलेल्या कोकेनच्या ५० वीटा सापडल्या.  याप्रकरणी एकाला अटक केली आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने आज जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.