नाकावाटे लसीमुळं कोरोना नियंत्रणात मदत होऊ शकेल - WHO

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाकाद्वारे दिली जाणारी कोविड-19 ची लस कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी  उपयोगी ठरू शेकल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. भारत बायोटेकनं विकसित केलेल्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी भारतानं मंगळवारी मान्यता दिली आहे.चीननंही, जगातील पहिली श्वासावाटे घेता येईल अशी इनहेलेबल - कॉन्विडेसिया एअर नावाच्या कोविड लसीला मान्यता दिली आहे.

संघटनेनं कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत या लसींचं स्वागत केलं असलं तरी, त्यांच्या मंजुरीसाठी पुष्टिकारक आकडेवारी लागेल असं म्हटलं आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यूंमध्ये सातत्यानं होणारी जागतिक घट उत्साहवर्धक जरी असली तरी हा कल कायम राहील असं गृहीत धरणं “धोकादायक” असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.