फ्रान्सच्या विदेश आणि युरोपीय व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सच्या विदेश आणि युरोपीय व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना उद्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. बुधवारी,  कोलोना,  विदेश व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी  द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. त्या गुरुवारी मुंबईतील उद्योगपतींना भेटणार आहेत.

भारत आणि फ्रान्स यांच्यात दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी आहे आणि ही भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी वेळोवेळी उच्चस्तरीय सल्लामसलत केली जाते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. फ्रान्सच्या विदेश मंत्र्यांच्या भारत भेटीमुळे व्यापार, संरक्षण, हवामान, स्थलांतर आणि गतिशीलता, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये भागीदारी आणखी मजबूत करण्याचा मार्ग मोकळा होईल असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं  सांगितलं आहे.