गेल्या २ वर्षांत आयकर विवरणपत्र वेबसाईटवर २३ हजार ६४० तक्रारी दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात ऑनलाईन आयकर विवरणपत्र भरणाऱ्या नागरिकांनी गेल्या २ वर्षांमध्ये इ दाखल या तक्रार निवारण पोर्टलवर २३ हजार ६४० तक्रारी दाखल केल्या आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे हि माहिती दिली आहे. मंत्रालयाने यापैकी ५ हजार ५९० तक्रारींची दखल घेतली असून त्यापैकी ८८९ तक्रारींच निवारण झालं असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.

देशभरात ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या पोर्टलची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहक व्यवहार विभागाचे  सचिव  रोहित कुमार सिंग आणि अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी इ दाखल पोर्टल ला २ वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ काल नवी दिल्लीत एका इ पुस्तकाचं प्रकाशन केलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image