आरक्षण मिळवलं म्हणजे काम संपलं नाही, ओबीसी एकत्र आले पाहिजेत - छगन भुजबळ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आरक्षण मिळवलं म्हणजे काम संपलं नाही, ओबीसी एकत्र आले पाहिजेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीन आयोजित कृतज्ञता मेळाव्यात बोलत होते. ओबीसी तरूणांना नोकऱ्या पाहिजेत. त्यासाठी उद्योग महाराष्ट्रात आणले पाहिजेत. त्यासाठी आता आवाज उठवावा लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, असं ते म्हणाले.

आपल्या कामावर विश्वास ठेवा आणि पळापळी करू नका असा सल्लाही भुजबळ यांनी यावेळी उपस्थितांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, आदि मान्यवर उपस्थित होते. केंद्र सरकार राज्यातले अनेक प्रकल्प काढून घेत आहे. महाराष्ट्राचं, मुंबईचं महत्व कमी केलं जात आहे. राज्याचा अभिमान जपत युवकांनी हा विषय हातात घेतला तरच परिवर्तन होऊ शकतं, असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी यावेळी केलं.

Popular posts
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व पसार उपक्रमांतर्गत प्रबोधनपर्व
Image
एमटीडीसीमार्फत विशेष सवलतींची व पर्यटनस्थळांची माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचे – पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती सुनील तटकरे
Image
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू
Image
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची ८० धावांपर्यंत मजल
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image