महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृतींवरील कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार

 

मुंबई : राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई कार्यालयामार्फत दरवर्षी राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामधील कलाकृती कलाकारांनी पुढील आठ दिवसात घेऊन जाण्याचे आवाहन कला संचालकांनी केले आहे.

राज्य कला प्रदर्शनात इच्छुक कलाकारांकडून कलाकृती मागविण्यात येतात. प्रदर्शन संपल्यावर कलाकृती घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधीत कलाकाराची असते. मात्र, अनेक कलाकार आपली कलाकृती नेत नसल्याने निदर्शनात आले आहे. संबंधित कलाकारांनी सदर कलाकृती पुढील आठ दिवसांत घेऊन न गेल्यास त्यांचा त्या कलाकृतींवरील हक्क संपुष्टात येणार असल्याची माहिती कला संचालनालयाने दिली आहे. तसेच सदर कलाकृती निर्लेखनाबाबत कला संचालनालयाच्या स्तरावरून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी 022 – 22620231/ 32 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.