दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी २८ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून सन २०२१ व २०२२ या वर्षांसाठी दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २८ ऑगस्ट, २०२२ पर्यंत आहे.

अर्ज, नामांकने www.awards.gov.in या संकेतस्थळावरुन भरण्याचे आवाहन दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार २०२१ व २०२२ करिता दि. २८ ऑगस्ट २०२२ पूर्वी प्राप्त अर्ज, नामांकने विचारात घेण्यात येतील. सन २०२१ आणि सन २०२२ करिता स्वतंत्ररित्या अर्ज, नामांकने केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL.www.awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करुन विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचनांनुसार विचारात घेण्यात येतील, असे दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी कळविले आहे.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image