केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केलं पालकत्व ॲपचं लोकार्पण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पालकत्व ॲपचं लोकार्पण केलं. बालकांसाठी जन्मापासून पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असून, या दरम्यान बालकांची शारिरिक, बौद्धिक वाढ होत असते. या ॲपच्या माध्यमातून पालकांना यासंबंधी माहिती उपलब्ध होणार आहे. दरम्यान, देशात बालमृत्यू दर कमी करण्यात वेगानं पावलं उचलली जात आहेत. २०१४ पासून ते २०१९ पर्यंत बाल मृत्यू दर हा दर हजारी ३५ एवढा कमी झाला असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image