अग्निपथ योजनेनुसार पहिला भरती मेळावा १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेनुसार पहिला भरती मेळावा उद्या १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार आहे. पुणे विभागातर्फे ८ मेळावे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा, दिव, दमण आणि नगर हवेली या ठिकाणी होणार आहेत. यामध्ये महिलांसाठीच्या भरती मेळाव्याचाही समावेश आहे.

अग्नीवीर योजनेअंतर्गत विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे.