वीज मीटरचं रिडींग घेताना हलगर्जीपणा करणाऱ्या ७६ संस्थांबरोबरचा करार रद्द

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वीज मीटरचं रिडींग घेताना हलगर्जीपणा करणाऱ्या ७६ संस्थांबरोबरचा करार महावितरणनं रद्द केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या ४१ अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी आता महावितरणनं साखर कारखान्यांना साकडं घातलं आहे. सभासद शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी कारखान्यांनी पुढाकार घेतला नाही, तर कारखान्यांकडची शिल्लक वीज कमी दरानं खरेदी करण्याचा इशारा, महावितरणनं दिला आहे. राज्यातले बहुतेक साखर कारखाने सहवीज प्रकल्प चालवतात आणि उसाच्या पाचटापासून वीज बनवतात. ही वीज कारखाने चालवण्यासाठी वापरली जाते आणि शिल्लक वीज महावितरणला विकली जाते. या वीज खरेदी कराराचं यंदा नूतनीकरण होणार असून त्या पार्श्वभूमीवर महावितरणनं कारखान्यांना ही अट घातली आहे.