विधिमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ.केशवरावजी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव

 

मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष डॉ.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खनिकर्म मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधिमंडळातील विविध पक्षांचे गटनेते, विधानसभा सदस्य सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे – पाटील, राजेश टोपे, आदित्य ठाकरे, यांच्यासह विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. धोंडगे यांच्या पत्नी सौ. प्रभावती, चिरंजीव पुरुषोत्तम यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष डॉ. नार्वेकर यांनी श्री. धोंडगे यांच्या कार्याचा उल्लेख करीत शुभेच्छा दिल्या