मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी करण्याचे आवाहन

 

पुणे : मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी  विशेष मोहीम राबविण्यात येणार असून मतदारांनी या प्रक्रीयेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन  पुणे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनांच्या अनुषंगाने हे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना आपले आधार कार्ड हे मतदार यादीतील नावाशी संलग्न करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे https://nvsp.in या वेब पोर्टलवर किंवा वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲप तसेच पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडील गरुडा ॲपच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी १ ऑगस्ट २०२२ पासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.