कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकात दक्षिण आणि उत्तर कन्नडात तसंच उडुपी जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. या जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाला आहे. कोडगु इथं जिल्हा प्रशासनानं आज शाळा, महाविद्यालयं आणि अंगणवाड्याना सुट्टी दिली आहे. पावसानं झाेडपलेल्या जिल्ह्यांच्या उपायुक्तांशी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी चर्चा केली.

मदतकार्य सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. संततधार पावसामुळे किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यात घरांचं आणि मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक तसंच एसडीआरएफ राज्य आपत्ती प्रतिसाद पथकांना तातडीनं तैनात केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.