आशियाई विकास बँकेने २०२२ चा चीनचा आर्थिक विकासाचा अंदाज ५ वरून ४ टक्क्यांवर आणला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई विकास बँकेने २०२२ चा चीनचा आर्थिक विकासाचा अंदाज पाच टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला आहे. कठोर कोविड उपाय आणि कडक लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये हे केले गेले आहे. या उपाययोजनांमुळे गृहनिर्माण क्षेत्रातील संकट आणखी वाढले आहे. बँकेने आशियाई क्षेत्राच्या परिस्थितीचा आढावा घेताना सांगितले की, २०२२ च्या सुरुवातीस, जेव्हा साथीचा रोग पुन्हा पसरला, तेव्हा कोविडविरोधी धोरण अवलंबले गेले आणि लॉकडाउन लादले गेले.

चीनमधील आर्थिक मंदी आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आशियाई विकास बँकेने संपूर्ण आशियातील आर्थिक वाढीचा अंदाज ४ पूर्णांक ६ दशांश टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. आशियाई विकास बँकेने २०२३ साठी आशियातील विकसनशील देशांसाठी आर्थिक अंदाज ५ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांवरून ५ पूर्णांक २ दशांश टक्क्यांपर्यंत कमी केला आहे आणि महागाईचा अंदाज ३ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांवरून वरून ३ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.