महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी विधानसभेत संमत
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विश्वास दर्शक ठराव जिंकला असून, बहुमत सिद्ध केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सदस्यांनी मतविभाजनांची मागणी केल्यानंतर सदस्यांच्या शिरगणतीनं मतमोजणी झाली. १६४ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं, तर ९९ सदस्यांनी विरोधात मतदान केलं. शिंदे गटात कालच सामिल झालेले हिंगोलीतल्या कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सरकारच्या बाजूने मतदान केलं. समाजवादी पार्टीचे २ आणि एमआयएमचे एक आमदार तटस्थ राहिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह २० सदस्य मतदानाच्या वेळी सभागृहात अनुपस्थित होते. त्यात काँग्रेसच्या १० आमदारांचा समावेश आहे. विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यावर यातले काही सदस्य सभागृहात दाखल झाले. विश्वासदर्शक ठरावानंतर शिवसेनेच्या ४० सदस्यांनी पक्षादेश पाळला नसल्याचा मुद्दा मुख्य प्रतोद सुनिल प्रभु यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. यावर हे सगळं सभागृहाच्या पटलावर असल्याचं सांगत अध्यक्षांनी परवानगी नाकारली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.