कोविडसंदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनीच पालन करावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
• महेश आनंदा लोंढे
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा कोविडचे रुग्ण वाढत आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी सतर्क राहणे आवश्यक असून यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की, सध्या कोविडचे रुग्ण दररोज वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना सतर्क राहण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण संचालक यांनी द्याव्यात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत दरवर्षी वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी बृहत आराखडा तयार केला जातो. या बृहत आराखड्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात काय सुधारणा करणे आवश्यक करणे याचा अभ्यास केला जातो. विद्यापीठामार्फत सर्वसमावेशक असा जेथे शासकीय, खाजगी आणि अभिमत विद्यापीठ एकत्रितपणे राबवू शकतील असा आराखडा असणे आवश्यक आहे, असेही श्री. देशमुख म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणारी वर्ग-1 आणि वर्ग-2 साठीची पदभरती करण्यात येत आहे. ही पदभरती पूर्ण झाल्यावर नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी रुजू करण्यात यावेत. तसेच वर्ग-3 भरती ही वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत आणि वर्ग-4 शी पदभरती बाह्यस्त्रोताद्वारे जेथे आवश्यक आहे करण्यात येत आहे या कामांना सुद्धा गती देणे आवश्यक असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.