सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचे आवाहन - राष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचं आवाहन केलं आहे. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करुन आगामी पिढ्यांसाठी पृथ्वीचं संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी लोकांना निसर्गाशी पुन्हा जोडून घेण्याचं आणि त्यामुळे होणारं  नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. पर्यावरण दिनाची या वर्षीची संकल्पना  'ओन्ली वन अर्थ' लोकांना आठवण करून देते की पृथ्वी हा ग्रह आपलं एकमेव घर आहे. त्यामुळं आपण सध्याच्या आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी निसर्गाशी एकरूप होऊन जगलं  पाहिजे असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image