मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन

 

मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दादर येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन मराठी भाषा तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. सीमा प्रश्न तसेच मराठी माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघ गेल्या 72 वर्षांपासून काम करत आहे. शासन अशा संस्थाच्या पाठिशी उभे असून त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल. मराठी वृत्तपत्र लेखक संघासाठी येत्या काही दिवसांत दादर परिसरात महापालिकेची जागा देण्यात येईल, अशी ग्वाही मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

दरम्यान, शासनाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काही कायदे केले. त्यामध्ये सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, मराठी पाट्यांची सक्ती केली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वृत्तपत्र लेखक संघाने पुढाकार घ्यावा, असे श्री. देसाई म्हणाले.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image