रशियाचा पूर्व युक्रेनमधल्या लुहान्स्क प्रातांवर ताबा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्व युक्रेनमधल्या लुहान्स्क प्रातांवर जवळजवळ पूर्ण ताबा मिळवल्याचं रशियानं काल सांगितलं. लुहान्स्का प्रातांत रशियाचे ९७ टक्के सैनिक असल्याचं रशियाचे संरक्षणं मंत्री सरगे शॉयगु यांनी म्हटलं आहे.

तसंच रशियाचे सैनिक पोप्सना, लायमन या भागातल्या १५ शहरांकडे आगेकूच करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, युक्रेनचे सैनिक रशियन सैनिकांबरोबर मुकाबला करत असल्याचं, युकेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.