देशभरात १४ ठिकाणी सुरक्षित आणि गैर-धोकादायक पद्धतीने अंमली पदार्थ नष्ट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात १४ ठिकाणी सुरक्षित आणि गैर-धोकादायक पद्धतीने ४४ हजार किलोग्राम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा ठिकाणी हे पदार्थ नष्ट करताना दूरस्थ पद्धतीनं पाहिले.

गुजरातमधील कच्छ, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे, तामिळनाडूमधील विरुधुनगर,बिहारमधील पाटणा आणि पश्चिम बंगालमधील सिलीगुडी इथं ही कारवाई करण्यात आली. याप्रसंगी,सीतारामन यांनी संबंधित ठिकाणी उपस्थित असलेल्या सीमाशुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक जबाबदार सदस्य म्हणून भारत अंमली पदार्थांच्या समस्येचा सामना करण्यासाठी जागतिक प्रयत्नांमध्ये खूप सक्रिय आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image