तस्करीमुक्त देशासाठी रेल्वे सुरक्षा दलाचा (RPF) असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ऍक्शन (AVA) सोबत सामंजस्य करार

 

नवी दिल्‍ली : तस्करीमुक्त देशासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ऍक्शन (AVA) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

देश तस्करीमुक्त करण्याच्या समान ध्येयाने एकत्र काम करण्याच्या दृष्टिकोनातून, रेल्वे सुरक्षा  दलाचे महासंचालक संजय चंदर, यांनी 8 एप्रिल 2022 रोजी कैलाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीत कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन (KSCF) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रजनी सिब्बल यांच्याशी तपशीलवार चर्चा केली.

आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून चर्चा पुढे नेण्यात आली ज्यामध्ये RPF आणि AVA (ज्याला बचपन बचाओ आंदोलन म्हणूनही ओळखले जाते) यांनी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, मानवी तस्करीविरूद्ध काम करण्याकरिता रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी, संवेदनशीलता वाढवण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करणे आणि मानवी तस्करीची प्रकरणे ओळखण्यात आणि शोधण्यात एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र काम करण्याची प्रतिज्ञा केली.  सामंजस्य कराराच्या चौकटीत दोन्ही हितधारकांनी केलेली संयुक्त कृती RPF ने देशभरात सुरू केलेल्या "ऑपरेशन AAHT" (मानवी तस्करी विरुद्ध कारवाई) चे प्रमाण, व्याप्ती आणि परिणामकारकता निश्चितपणे वाढवेल.

रेल्वे सुरक्षा  दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत 2018 पासून 50,000 हून अधिक मुलांची सुटका करण्यात आली असून रेल्वे मंत्रालय मुलांच्या सुटकेसाठी आणि इतर संबंधितांसोबत काम करण्यासाठी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार जबाबदारी पार पाडत आहे. रेल्वेने मानवी तस्करी विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी अलीकडेच "ऑपरेशन AAHT" सुरू केले आहे आणि मानवी तस्करीच्या बळींची तस्करी करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका करत आहे.