भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

 

मुंबई : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा ८५ हजार २४० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे.

शिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांना दि १४ मे २०२२ रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मे ए आर एम ट्रेडर्स ३८तळमजला, रामगड हटमेंट, शिवडी मुंबई १५ या ठिकाणची तपासणी केली. चहा पावडर या अन्नपदार्थास खाद्यरंग लावून विक्रीसाठी साठा केला असल्याचा आढळला तसेच खाद्यरंग आढळून आला. हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तेथून चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेवून उर्वरित ४२९ किलोग्रॅमचा चहा पावडरचा साठा किंमत ८५ हजार २४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत .

संबंधित हजर व्यक्ती पेढीमालक यांचे विरुद्ध शिवडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यात आलेली आहे. ही कारवाई म.ना.चौधरीसह आयुक्त (अन्न)अन्न व औषध प्रशासनबृहन्मुंबई व एस.एस.जाधवसहायक आयुक्त (अन्न)परिमंडळ ३ यांचे मार्गदर्शनाखाली ल.सो.सावळेअन्न सुरक्षा अधिकारीर.ज.जेकटेअन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image