गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहण्याची केंद्रसरकारची ग्वाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारपेठेत गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहील, अशी ग्वाही अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिव सुधांशु पांडे यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. सार्वजनिक वितरण प्रणाली ही देशातील अन्न सुरक्षा योजनेचा आधार आहे, याचा लाभ जवळपास ८१ कोटी ३५ लाख नागरिकांना मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं.

भारत वगळता इतर देश ४५० ते ४८० डॉलर प्रति टन दरानं गहू विकत आहेत. या वर्षी भारतात गव्हाचा प्रारंभिक साठा १९० लाख टन होता जो गेल्या वर्षीच्या २७३ लाख टनांच्या साठ्यापेक्षा थोडा कमी आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली. गव्हाचा साठा आणि उपलब्धतेच्या बाबतीत देश सुरक्षित स्थितीत आहे असं कृषी सचिव मनोज आहुजा यांनी यावेळी सांगितलं. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image