२०२५ पर्यंत २ लाख किमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्याचं उद्दिष्ट- नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नवभारताची संकल्पना पूर्ण करण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य असून, २०२२-२३ मध्ये प्रतिदिन ५० किलोमीटर अशा विक्रमी वेगानं १८ हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याचा देशभर विस्तार करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.

२०२५ सालापर्यंत २ लाख किमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केलं आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास आत्मनिर्भर भारताचा 'आत्मा' आहे, यादृष्टीनं तो ठराविक वेळेत पूर्ण व्हावा, यावर भर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.