मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दुपारी गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. या अपघातात गॅस टँकरचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुण्याच्या रुग्णालयात पाठवलं आहे.