मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२२ उद्यापासून सुरु

 


मुंबई (वृत्तसंस्था) : देशातला  अग्रगण्य चित्रपट महोत्सव-मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२२ उद्यापासून सुरु होणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या द्वेवार्षिक  महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मुंबईतल्या वरळी इथल्या  नेहरू केंद्रात होणार आहे, तर चित्रपटांचं प्रसारण, फिल्म डिव्हिजनच्या संकुलात असलेल्या विविध अत्याधुनिक चित्रपटगृहांत होईल. मिफ्फ २०२२ साठी, जगभरातील चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या महोत्सवासाठी, ३० देशांतून एकूण ८०८ प्रवेशिका आल्या आहेत. महोत्सवाच्या  स्पर्धा विभागात, १०२ चित्रपट दाखवले जाणार आहेत. यापैकी ३५ आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटात आणि ६७ राष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटात असतील. १८ चित्रपट मिफ्फ प्राइम  विभागात दाखवले जातील. यावर्षी प्रथमच १८ वर्षांखालील मुलं या महोत्सवात सहभागी होऊ शकणार आहेत.  'रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स रामा' आणि 'मायटी लिटल भीम: आय लव्ह ताजमहाल' हे दोन उत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट पाहण्याची संधी मुलांना लाभणार आहे. हे चित्रपट पाहण्यासाठी मुलांना विनामूल्य प्रवेश मिळेल. याशिवाय  मुलांना भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला देखील  भेट देता येईल आणि चित्रपट क्षेत्रातल्या तज्ञांशी संवाद साधता येईल.