कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी, ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची निवड

 

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या १७ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी, ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मुंबईत ही माहिती दिली.

 मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणं, तसंच  देशातल्या  चित्रिकरण आणि  पर्यटन स्थळांचं  महत्व वाढवणं या हेतुनं राज्य शासन मराठी चित्रपटांचं प्रदर्शन कान्स आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवात करतं. या महोत्सवासाठी निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होतात. 

यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी शासनाकडून पाठवायच्या ३ मराठी चित्रपटांची निवड करण्यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत ७ तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती.