राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात  माउ, इथं  भारतीय बीज अनुसंधान संस्थेत झालेल्या ३७ व्या वार्षिक बिजोत्पादन आढावा बैठकीत देशातल्या ६५ प्रकल्पांमधे विद्यापीठाला हा सन्मान मिळाला. या बिजोत्पादन प्रकल्पाद्वारे तयार होणारं फुले बियाणं हे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर शेजारच्या राज्यातले  शेतकरी आणि बिजोत्पादन कंपन्यांच्या पसंतीस उतरलं आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या कांदा फुले समर्थ बियाण्याला तसंच सोयाबीन पिकाचं फुले संगम आणि फुले किमया या वाणांच्या बियाण्याला शेतकऱ्यांची पहिली पसंती असते.

Popular posts
महिलांसाठी साडे सात टक्के व्याज दर देणाऱ्या महिला सन्मान बचत पत्राची घोषणा
Image
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image