मोदी @२०: ड्रीम्स मीट डिलिव्हरी या पुस्तकाचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी @२०: ड्रीम्स मीट डिलिव्हरी या पुस्तकाचं प्रकाशन आज दिली इथं उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाची २० वर्ष पूर्ण झाली, त्याचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री मोदी देशाच्या विकसाबाबत स्वप्न पाहतात, ती कमी वेळेत सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात, असे गौरवोद्गार उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी काढले.  मोदींच्या नेतृत्वात जगात देशाचा सन्मान वाढतो आहे असही उपराष्ट्रपती एम. वेंकय्यानायडू यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला सर्व केंद्रीय मंत्री, विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री अमित शाह, एस. जयशंकर यांनी देखील प्रधानमंत्र्यांविषयी आपले विचार मांडले.