दिल्ली उच्च न्यायालयात नव्या ९ न्यायाधीशांची नियुक्ती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपतींनी केली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणं तारा वितस्ता गंजू, मिनी पुष्कर्ण, विकास महाजन, तुषार राव गेडेला, मनमीत प्रीतम सिंग अरोरा, सचिन दत्ता, अमित महाजन, गौरांग कांत आणि सौरभ बॅनर्जी यांची नियुक्ती झाली आहे.

या सर्वांची नियुक्ती त्यांच्या ज्येष्ठताक्रमानुसार झाल्याचं पत्रकात म्हटलं आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं नियुक्तीसाठी त्यांच्या नावांची शिफारस केली होती.