प्रधानमंत्री बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवूबा यांच्या निंमत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार आहेत. प्रधानमंत्री यावेळी बौद्ध संस्कृतीच्या  एका विशिष्ट केंद्राच्या पायाभरणी समारंभाला उपस्थिती  राहणार आहेत.

यावेळी ते पवित्र अशा मायादेवी मंदिरातही पूजा करतील. बुद्धपौर्णिमेच्यानिमित्तानं लुंबिनी विकास संस्थेनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत.