मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सून येत्या २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमानचा समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात हा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळं पुढच्या ५ दिवसात अंदमान - निकोबार बेटांवर वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात ताशी ४०-५० किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात. केरळमधल्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी देशाच्या वायव्य भागात तसंच मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून येत्या २ दिवसात त्याची तीव्रता कमी होईल, असंही हवामान विभागानं म्हटलंय.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image