२०१६ ते २०२१ या कालावधीत दरवर्षी सुमारे साडे पाच कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला असून मोठ्या संख्येने ते या योजनेशी जोडले गेले आहेत' असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज व्यक्त केले. सध्या सुरू असलेल्या 'किसान भागिदारी, प्राथमिकता हमारी' या मोहिमेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष 'पिक विमा कार्यशाळा' या अभियानामध्ये तोमर यांनी सहभाग घेतला.

या कार्यशाळेत देशाच्या विविध भागांतील सुमारे १ कोटी शेतकरी बांधव सहभागी झाले होते. पिक विमा योजनेअंतर्गत खरीप २०१६ ते खरीप २०२१, या कालावधीत दरवर्षी सुमारे साडे पाच कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला. त्यांनासुमारे १ लाख १५ हजार कोटी रुपये पीक विम्याचा दावा म्हणून देण्यात आले, असंही तोमर यांनी सांगितलं.

लाभार्थ्यांनी या योजनेचा अधिकाधिक प्रसार करून अन्य शेतकरी बांधवांनाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहनही कृषि मंत्र्यांनी यावेळी केलं. 

Popular posts
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image