राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार सन २०२१-२२ जाहीर

 

मुंबई : सामान्य प्रशासन विभागामार्फत सन २०२१-२२ या वर्षाकरिता “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा राबविण्यात आली. या अभियानातंर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोकृष्ट कल्पना या वर्गवारीत राज्यस्तरीय निवड समितीमार्फत पात्र व अंतिम पुरस्कार विजेते  जाहीर करण्यात आले आहेत. या संबंधीचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि.१८ एप्रिल 2022 रोजी निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत प्राप्त पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावर सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव या वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, मुंबई, पारितोषिकाचे स्वरुप रोख  दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई, पारितोषिकाचे स्वरुप रोख. सहा लाख रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, पारितोषिकाचे स्वरुप रोख  चार लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार  पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर , पारितोषिकाचे स्वरुप रोख  दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार  पंचायत समिती, राहता, अहमदनगर पारितोषिकाचे स्वरुप रोख  चार लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

महानगरपालिका वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पारितोषिकाचे स्वरुप रोख  दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार आयुक्त, नागपूर महानगरपालिका, पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार  आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका पारितोषिकाचे स्वरुप रोख  चार लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

सर्वोकृष्ट कल्पना अंतर्गत शासकीय संस्था वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार तहसिल कार्यालय, तळोदा, नंदुरबार, पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार तहसिल कार्यालय, नवापूर, नंदुरबार पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार जिल्हाधिकारी अकोला पारितोषिकाचे स्वरुप रोख  वीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

शासकीय अधिकारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार डॉ. राजेंद्र बी. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर, पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार श्री. अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार श्री. एकनाथ बिजवे, नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरुप रोख  वीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

शासकीय कर्मचारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार श्री. अजय राजाराम लोखंडे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, भडगाव नगरपरिषद, भडगाव, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार श्री. निशीकांत सुर्यकांत पाटील, तलाठी, पारोळा शहर, तलाठी कार्यालय पारोळा, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, देण्यात येणार आहे.