हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न व्हायलाहवेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी व्यक्त केली आहे. ते पुणे इथल्या पर्यावरण परिषदेत दूरदृश्यप्रणाली द्वारे  बोलत होते. पर्यावरण परिषद पुण्यात होत असल्याबद्दलत्यांनी अभिमान व्यक्त केला. पेट्रोल डिझेलच्या पर्यायांवर चर्चा होत असते. १००-२०० वर्षे आपण एखादी गोष्ट वापरतो अणि,  त्यानंतरत्याला पर्याय शोधतो हे योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.सरकार फक्त महाराष्ट्राचाचं नाही, तर देशाचाही विचार करतं. महाराष्ट्र हे दिशा देणारंराज्य असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात उद्योजकांनी गुंतवणूक करावी यासाठी गुंतवणूकदारांच्यामार्गातले अडथळे दूर करायचं काम राज्य सरकार करत आहे असंही ते म्हणाले.