चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे तिथे अतिदक्षतेचा इशारा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे, परिस्थिती गंभीर बनली असून तिथे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोविड संसर्गाचा केंद्रबिंदू शांघाय शहर आहे. आणि तिथे आणखी ३९ मृत्यू झाल्याची नोंद आहे. एका दिवसातली गेल्या महिन्याभरातली ही सर्वाधिक मृत्यू संख्या आहे. बीजिंग शहरात काल नव्या २१ कोरोनाबाधितांची नोंद झाली.

चाओयांग जिल्ह्यातल्या सर्व दूतावास तसच सर्व परदेशी नागरिकांना आजपासून तीन दिवसात तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उद्रेकामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असून लोक मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक वस्तूंचा साठा करत आहेत, तसंच ऑनलाइन खरेदीतही वाढ झाली आहे.