यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ च्या खरीप विपणन हंगामात ७ कोटी ५० लाख टन धान खरेदी केली असल्याचं ग्राहक कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे.

देशातल्या एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना या खरेदी प्रक्रियेचा फायदा झाला असून त्यांना किमान आधारभूत किमतीनुसार एकूण एक लाख ४७ हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.

याशिवाय, सरकारनं २०२२-२३ च्या रब्बी हंगामासाठी मध्य प्रदेश, हरियाना, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून गव्हाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. या महिन्याच्या तीन तारखेपर्यंत ३४ हजार ९१७ टन गहू खरेदी करण्यात आला आहे.