भारत ही जगासाठी औषध निर्मितीची राजधानी - केंद्रीय आरोग्यमंत्री

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत ही जगासाठी औषध निर्मितीची राजधानी ठरली आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयडीएमए अर्थात भारतीय औषध निर्माण उद्योग संघटनेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्राच्या उद्धाटनसमारंभात बोलत होते. सध्याचं सरकार गरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं असतानाच उद्योगस्नेही देखील आहे, असं ते म्हणाले. देशाच्या विकासात उद्योगांची भूमिका महत्वाची असते, देशाला स्वंयपूर्ण करण्यातही उद्योग महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यात औषधनिर्मिती उद्योग आघाडीवर आहे, असं त्यांनी सांगितल.