पोषण अभियान क्षेत्रीय कार्यशाळेचे १२ एप्रिल रोजी आयोजन

 

मुंबई : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही राज्य व दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेश यांच्या क्षेत्रीय कार्यशाळेचे दिनांक 12 एप्रिल, 2022 रोजी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे आयोजन करण्यात आलेले आहे.

ही कार्यशाळा केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महिला व बाल विकास विभाग मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, हे उपस्थिती राहणार आहेत. तसेच आमंत्रित राज्यांचे समाजकल्याण मंत्री, महिला व बाल विकास मंत्री, महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव, सचिव,आयुक्त, संचालक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय युनिसेफ, युएनवूमन, युएनएफपीए आणि नागरी समाज संघटना या सारखे भागधारक देखील सहभागी होणार आहेत.

या बैठकीत महिला व बालकांसाठीच्या योजना, उपक्रम व त्यात भविष्यात केले जात असलेले बदल यावर चर्चा होणार आहे, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image