नरेंद्र मोदी यांनी साधला दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दक्षिण कोरियाचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष युन सुक यिओल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि निवडणुकीतल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. सध्याच्या जागतिक वातावरणात दोन्ही देशांमधली सामरिक भागीदारी अधिक मजबूत करायला महत्व द्यायला हवं, या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. दोन्ही देशांमधल्या सहकार्याला गती देण्यासाठी तसंच हे लक्ष्य गाठण्यासाठी विविध क्षेत्रात एकत्र काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.