संघटन हेच शिवसेनेचं खरं बलस्थान आहे - संजय राऊत

 


मुंबई (वृत्तसंस्था) : संघटन हेच शिवसेनेचं खरं बलस्थान असून विदर्भात पक्ष संघटन आणि पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी शिवसेनेनं आजपासून शिवसंपर्क अभियान सुरु केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या हस्ते आज नागपुरात या अभियानाचा आरंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भातल्या शिवसेनेच्या पदाधिका-यांशी संवाद साधण्याच्या हेतूने आणि मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी या अभियानात भर दिला जाणार आहे, असं ते म्हणाले. शिवसेनेचं विदर्भातलं विधानसभेचं प्रतिनिधित्व का कमी झालं याचा अभ्यास करून जिथे शिवसेना लढू शकली नाही, त्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद पुनर्स्थापित करावी, असं आवाहन राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image