परमबीर सिंग गैरव्यवहार प्रकरणांचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधीत भ्रष्टाचार- गैरव्यवहार प्रकरणांचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयही सर्वोच्च न्यायलयानं रद्द केला.

काही ठोस बाबींचा तपास सीबीआयमार्फत होण्याची आवश्यकता असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं.या प्रकरणी दोषी कोण आहेत, सत्य काय आहे हे बाहेर येणं गरजेचं आहे, असंही निरिक्षण न्यायालयानं नोदंवलं. सीबीआयनं निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी सुचना न्यायालयानं केली. मात्र विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image