स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेत प्रमोद भगतनं पटकावले २ रौप्य आणि १ कांस्यपदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२२ स्पर्धेमध्ये प्रमोद भगतनं दोन रौप्य आणि एक कांस्यपदक तर सुकांत कदमनं कांस्यपदक जिंकलं.

जागतिक चॅम्पियन प्रमोद भगत यानं स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२२ मध्ये पुरुष एकेरी SL3 रौप्य आणि मिश्र दुहेरी SL3-SU5 कांस्यपदक जिंकलं. यापूर्वी प्रमोद आणि त्याची मिश्र दुहेरी जोडीदार पलक कोहली यांनाही रुथिक रघुपती आणि मानसी गिरीशचंद्र जोशी या भारतीय जोडीकडून पराभव कांस्य साठी पत्करावा लागला होता.