आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार - देवेंद्र फडनवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महविकास आघाडी सरकार हे राज्याच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार असून आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत, अधिवेशनापूर्वी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. या सरकारच्या चहापानाला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्याची वीज कापणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच्या अधिवेशनात दिलं होतं. तरीही त्यांची वीज कापली जात आहे. याविषयी सरकारला जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अनेक ठिकाणी अतिरिक्त ऊस आहे. अनेक ठिकाणी ऊस गाळप साठी जाणार नाही अशी परिस्थिती आहे. या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं ते म्हणाले. नवाब मलिक यांनी राजीनामा दिलेला नाही, हा एकप्रकारे राज्य घटनेचा अवमान आहे. देशात असं कुठंही घडलेले नाही. मलिक यांचा राजीनामा सरकारनं घेतलाच पाहिजे. त्यांच्या राजीनाम्यासाठी सभागृहात संघर्ष करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image