२२ मार्च रोजी जागतिक जलदिन; राज्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन

 

मुंबई : दरवर्षी 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जलदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून दि. 16 ते 22 मार्च हा सप्ताह संपूर्ण राज्यात ‘जल जागृती सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

राज्यात सर्वत्र दि. 16 ते 22 मार्च या कालावधीत ‘जल जागृती सप्ताह’ अंतर्गत राज्य, विभागस्तरावर, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामार्फत जलजागृती उपक्रम राबविण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णय उपलब्ध आहे. या शासन निर्णयाचा संकेतांक 201602111732068327 असा आहे.