उत्तर कोरिया हल्ल्याचे अधिक मजबूत मार्ग आणि साधनं विकसित करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या शस्त्रागाराच्या आधुनिकीकरणासाठी उत्तर कोरिया हल्ल्याचे अधिक मजबूत मार्ग आणि साधनं विकसित करणार आहे, असं आज उत्तर कोरियानं स्पष्ट केलं. गेल्या गुरूवारी उत्तर कोरियानं वासाँग १७ या लांब पल्ल्याच्या नव्या क्षेपणास्त्र प्रणालीचं यशस्वी उड्डाण केलं. त्याच्याशी संबंधित संशोधकांसमवेत केलेल्या फोटोसेशनदरम्यान राष्ट्राध्यक्ष किम जॉंग उन यांनी आज हे निवेदन केलं.

ही २५ मिटर लांब क्षेपणास्त्र प्रणाली १५ हजार किलोमीटरपर्यंत म्हणजे अमेरिकेत कुठेही पोहोचू शकते. जगातली ही सगळ्यात मोठी फिरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. या क्षेपणास्त्रात अनेक शस्त्रास्त्र वाहण्याची क्षमता आहे. ज्या राष्ट्राकडे हल्ल्याची क्षमता अधिक आहे आणि ज्यांचं लष्करी सामर्थ्य मोठं आहे तेच राष्ट्र युद्धाला अटकाव करू शकते, असंही किम म्हणाले.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image