गतिमंद बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोषी आरोपीला न्यायालयानं सुनावली मरेपर्यंत जन्मठेप

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यात आठ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषी आरोपीला न्यायालयानं, मरेपर्यंत म्हणजे नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप, आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातल्या एकलग्न इथला हा दोषी आरोपी असून रमेश कळसकर असं त्याचं नाव आहे.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी एन खडसे यांनी काल हा निकाल दिला. पीडीत मुलगी गतिमंद असल्यानं मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षकांच्या मदतीनं सांकेतिक भाषेद्वारे तिची साक्ष नोंदवली होती.