२१८ भारतीयांना घेऊन बुखारेस्टवरुन निघालेलं नववं विमान नवी दिल्लीत पोहचलं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑपरेशन गंगा अंतर्गत, २१८ भारतीयाना घेऊन बुखारेस्टवरुन निघालेलं नववं विमान आज नवी दिल्लीत पोहचलं. युक्रेनमंध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आज सकाळीच हे विमान रोमानियाची राजधानी बुखारेस्ट इथून निघाल्याचं ट्विट परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं होतं. आठवं विमानही हंगेरीची राजधीनी बुडापेस्ट इथून निघाल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

१८२ भारतीयांना निघालेलं सातवं विमान आज पहाटे मुंबईत पोचलं, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या भारतीयांचं स्वागत केलं. 

ऑपरेशन गंगाअंतर्गत मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत १ हजार ४०० पेक्षा जास्त भारतीयांना युक्रेनमंधून परत आणलं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image